चंदगड : सी एल वृत्तसेवा
घाटकरवाडी (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील गंगा-चंद्र साहित्य कला सेवा मंच यांच्यावतीने सन २०२५ मधील राज्यस्तरीय पुरस्कारासाठी काव्यसंग्रह पाठवण्याचे आवाहन केले होते. याला राज्यभरातून अभूतपूर्व प्रतिसाद लाभल्याचे सचिव वैष्णवी पाटील यांनी सांगितले.
मंचच्या वतीने चार पुरस्कारांसाठी मागवलेल्या काव्य पुरस्कारांमध्ये निवड झालेले काव्यसंग्रह- पुरस्काराचे नाव, काव्यसंग्रहाचे नाव, पुरस्कार विजेते कवी व कवीचे गाव पुढील प्रमाणे
सर्व कवींसाठी खुला श्रीहरी काव्य पुरस्कार - 'काळच उत्तर देईल' डॉ. श्रीकांत पाटील (घुणकी, कोल्हापूर).
केवळ महिला कवींसाठी जिजाई काव्य पुरस्कार 'मौनातील चाफा' रेखा दीक्षित उर्फ आशारेखा (कोल्हापूर).
नवोदित कवींच्या पहिल्या काव्यसंग्रह साठी सुवर्ण साक्षी काव्य पुरस्कार - 'आदिम दुःखाचे वर्तुळ' भारती पाटील (कामेरी, जिल्हा सांगली).
गंगा- चंद्र विशेष काव्य पुरस्कार- 'शब्द माझे सोबती' स्नेहल पंडित (आजरा, जिल्हा कोल्हापूर).
विजेत्या सर्व कवींचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून या पुरस्कारांचे वितरण समारंभ पूर्वक मान्यवरांच्या हस्ते लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती मंचच्या सचिव सौ वैष्णवी दत्तात्रय पाटील यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment