कालकुंद्री येथील हौशाक्का कदम यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

20 May 2025

कालकुंद्री येथील हौशाक्का कदम यांचे निधन

  

हौशाक्का कदम

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

                सावरकर नगर, कालकुंद्री (ता चंदगड) येथील श्रीमती  हौशाक्का लक्ष्मण कदम-गोंधळी, वय ९७ यांचे मंगळवार दि. २०/०५/२०२५ रोजी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले.  त्यांच्या पश्चात विवाहित दोन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे, पणतवंडे असा परिवार आहे. गावातील कल्मेश्वर विकास सेवा संस्थेचे सचिव श्रीकांत कदम व गणेश मूर्तिकार शंकर कदम यांच्या मातोश्री होत.  त्यांच्यावर कालकुंद्री स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षाविसर्जन गुरुवार दि. २२ रोजी होणार आहे.

No comments:

Post a Comment