कुदनूर- हंदिगनूर रस्ता पूर्णत्वाकडे, माजी आम. राजेश पाटील यांच्याकडून १.३५ कोटींचा निधी, बेळगाव बस सुरू होणार? - चंदगड लाईव्ह न्युज

22 May 2025

कुदनूर- हंदिगनूर रस्ता पूर्णत्वाकडे, माजी आम. राजेश पाटील यांच्याकडून १.३५ कोटींचा निधी, बेळगाव बस सुरू होणार?

कुदनूर : सी एल वृत्तसेवा

      अनेक वर्षे दुरावस्थेत असलेल्या कुदनूर (ता. चंदगड) ते बेळगाव तालुक्यातील हंदिगनूर रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. चंदगडचे तत्कालीन आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांनी या रस्त्यासाठी १ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. दुरावस्थेतील हा रस्ता पूर्ण होत असल्याने ग्रामस्थ, प्रवासी व वाहनधारक यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे. 

      या रस्त्यावरून पन्नास वर्षांपूर्वी बेळगाव, अगसगे, हंदिगनूर,खन्नेटी, कुदनुर मार्गे कालकुंद्री अशी बेळगाव डेपोची बस सुरू होती. कच्चा रस्ता असल्यामुळे ही बस त्या काळात फक्त उन्हाळ्यात चालू असायची तर पावसाळ्यात  बंद व्हायची. त्यानंतर वीस पंचवीस वर्षांपूर्वी हा रस्ता डांबरीकरण करण्यात आल्याने काही काळ बंद असलेली ही बस पुन्हा सुरू करण्यात आली होती. पण कुदनूर, खन्नेटी ते हंदिगनूर या मुळातच अरुंद असलेल्या रस्त्यातून कुदनूर गावातील गाई म्हशींची या मार्गावर सकाळ-संध्याकाळ मोठी गर्दी होत असल्याने बस वाहतुकीस अडथळा येत होता. परिणामी बेळगाव आगाराने ही बस बंद केली होती. गेली अनेक वर्षे बंद असलेली बेळगाव डेपोची बस या मार्गावरून पुन्हा सुरू करावी अशी मागणी कुदनूर परिसरातील प्रवासी वर्गातून होत आहे.

      माजी आमदार राजेश पाटील यांनी २ कोटी ६५ लाख रुपये निधी देऊन या रस्ताचे काम पूर्ण करत दिलेला शब्द पाळला आहे. यामुळे माजी आमदार यांच्या कामाचे कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment