चंदगड : सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील मोटनवाडी ते पाटणे फाटा मार्गावर आंबेवाडी फाटा जवळ पाठलाग करून चंदगड पोलिसांनी गोवा बनावटीच्या अवैध दारूचा साठा जप्त केला. ही कारवाई 30 एप्रिल रोजी २.०० वाजता चे सुमारास करण्यात आली.
प्रकाश भरमगोडा पाटील, रा. रामलिंग खिंड गल्ली बेळगाव, अतिराज रामचंद्र पारधी, रा. तानाजी गल्ली बेळगाव, यांनी सुभाष सुधीर डे, रा. महाद्वार रोड बेळगाव यांच्या सांगण्यावरून महाराष्ट्र शासनाचा कर चुकवण्याच्या उद्देशाने गोवा बनावटीच्या दारूच्या सीलबंद बाटल्या मारुती सुझुकी कंपनीच्या स्विफ्ट डिझायर कार मधून बेकायदा बिगर परवाना विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करीत होते. याची खबर मिळतात चंदगड पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून ही गाडी आंबेवाडी फाटा रोडवर पकडली यावेळी गाडीत यंग रॉयल्स व्हिस्की, डीएसपी ब्लॅक व्हिस्की, मॅजिक मोमेंट होडका, बकार्डी मॅंगो चिल्ली रम अशा विविध आकाराच्या विविध किमतीच्या बाटल्या तसेच काजूची हातभट्टी दारूचे तीन कॅन असा सुमारे १ लाख ८२ हजार ४८०₹ किमतीची दारू व सुमारे ५ लाख किमतीची स्विफ्ट डिझायर कार असा ६ लाख ८३ हजार ४८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबतची फिर्याद पोलीस उपनिरीक्षक हनमंत नाईक यांनी चंदगड पोलीस ठाणे येथे दिली असून घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस सब इन्स्पेक्टर शितल धवीले करत आहेत. संशयित आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ अ, ई, ९०, १०८, ८३ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment