राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत चंदगड येथे लहान मुलांच्या १.५० लाखांच्या शस्त्रक्रिया मोफत - चंदगड लाईव्ह न्युज

03 May 2025

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत चंदगड येथे लहान मुलांच्या १.५० लाखांच्या शस्त्रक्रिया मोफत

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ११ मुलांच्या शस्त्रक्रिया यशस्वी केल्यानंतर तज्ञ डॉक्टरांसमवेत चंदगड ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी
चंदगड : सी एल वृत्तसेवा 
   राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयात नुकतेच शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. यावेळी तालुक्यातील ११ लहान मुलांपैकी ६ मुलांच्या जीभ व ५ मुलांच्या शिश्नचर्म विकारांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. खाजगी दवाखान्यात या शस्त्रक्रियांची फी सुमारे दीड लाख पेक्षा अधिक झाली असती. राष्ट्रीय ग्राम बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत तालुक्यात अंगणवाडी व शालेय तपासणीतून हे रुग्ण आढळले होते. पालक वर्गातून शासनाच्या या लोकाभिमुख कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त होत आहे.
   या शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवराज कुपेकर, उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज चे शल्यचिकित्सक डॉ चंद्रकांत खोत, भूलतज्ञ डॉ. देविका कुपेकर,नोडल ऑफिसर डॉ योगेश पोवार, वैद्यकीय अधिकारी डॉ स्नेहल पाटील, डॉ पल्लवी निंबाळकर यांच्यासह ग्रामीण रुग्णालय चंदगड च्या स्टाफचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment