बेळगाव : सी एल वृत्तसेवा
बेळगाव येथील महाद्वार रोड सांस्कृतिक कमिटी यांच्या वतीने शिवजयंती उत्सव निमित्त नाट्यसम्राट ही शिवकालीन देखावा स्पर्धा गुरुवारी (दि. 8) ते सोमवार (दि. 12) या दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी लाखो रुपयांची बक्षीस असून चंदगड, आजरा गडहिंग्लज तसेच अन्य ठिकाणच्याही संघांना सहभागी होता येणार आहे. सदर स्पर्धा छत्रपती संभाजी महाराज उद्यान, महाद्वार रोड येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी विजेत्यांना अनुक्रमे 71 हजार रुपये, 33 हजार रुपये, 22 हजार रुपये रोख रक्कम व चषक देण्यात येणार आहे. तर उत्तेजनार्थ म्हणून तीन संघांची निवड करून प्रत्येकी 5,500 रुपये तर वैयक्तिक कौशल्यावर आधारित स्पर्धकांनाही बक्षीसे देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी प्रवीण चंदगडकर (मोबाईल क्रमांक : 9449370815) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सदर स्पर्धा रोज सायंकाळी 7: 30 वाजता होणार असून लहान मुले व तरुणांसाठी वेशभूषा व त्याबद्दल थोडक्यात विश्लेषण स्पर्धाही होणार आहे. या स्पर्धेसाठीही विजेत्यांना रोख रक्कम म्हणून बक्षीस देण्यात येणार आहे. सदर स्पर्धा सर्वांसाठी खुली राहणार आहे, या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment