कालकुंद्री शिवारात पडण्याच्या स्थितीतील विद्युत खांब दुरुस्त करण्याची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

12 June 2025

कालकुंद्री शिवारात पडण्याच्या स्थितीतील विद्युत खांब दुरुस्त करण्याची मागणी

 


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

   कालकुंद्री (ता. चंदगड) गावच्या शिवारात असलेला विद्युत खांब पडण्याच्या स्थितीत आला आहे. हा खांब शेती अंतर मशागत करताना तसेच येथून जाणाऱ्या बैलगाड्या व इतर वाहनांना धोकादाय ठरत आहे. हा खांब वीज वितरण कंपनीने तात्काळ उभा करावा. अशी मागणी होत आहे. 

     कागणी ते होसुर- बेळगाव कडे जाणाऱ्या मुख्य मार्गाला बुक्किहाळ  फाट्याच्या पूर्वेला जोडणारा हा पाणंद रस्ता असून तो पुढे कालकुंद्री गावच्या  काटेशिवारातून किटवाड धरणाकडे जातो. त्यामुळे या मार्गावर बैलगाड्या, ट्रॅक्टर, शेतीच्या मशागतीसाठी जाणारी औते यांची नेहमी वर्दळ असते. गावाचे माजी सरपंच एन. के. पाटील यांच्या शेतात असलेला हा खांब पावसाळ्यात खाली पडल्यास शेतकरी व जनावरांची जीवित हानी होण्याचा संभव असून भविष्यात दुर्घटना घडण्यापूर्वी दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment