किटवाड येथील कसलकर गल्लीतील रस्त्याची दुर्दशा, ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात - चंदगड लाईव्ह न्युज

11 June 2025

किटवाड येथील कसलकर गल्लीतील रस्त्याची दुर्दशा, ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात


चंदगड : सी एल वृत्तसेवा
    किटवाड (ता. चंदगड) येथील कसलकर गल्लीमधील रस्त्याची दुर्दशा झाली आहे. गल्लीतील रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे तसेच सांडपाणी साठवून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी गल्ली तील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तर या खड्ड्यांमध्ये माती व चिखल साठून राहिल्याने गल्लीतील व इतर लोकांना येजा करणे कठीण झाले आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्याबाबत ग्रामपंचायतला सूचना करूनही कोणतीच कारवाई कार्यवाही दृष्टीपथात दिसत नाही. तरी या रस्त्याकडे ग्रामपंचायत, संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन तात्काळ रस्ता दुरुस्तीचे काम हाती घ्यावे. अशी मागणी सचिन कसलकर व ग्रामस्थ किटवाड यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment