![]() |
| रामचंद्र लक्ष्मण आंबेवाडकर |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कुदनूर (ता. चंदगड) येथील रहिवाशी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख रामचंद्र लक्ष्मण तथा रा. ल. आंबेवाडकर, वय ८५ यांचे आज दि. ९/९/२०२५ रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने बेळगाव येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित दोन मुलगे, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. ते चंदगड तालुक्यातील पहिले पदवीधर प्राथमिक शिक्षक व १९९५ मध्ये केंद्रप्रमुख पद निर्माण झाल्यानंतर पहिल्याच बॅचचे ते केंद्रप्रमुख होते. केंद्रप्रमुख म्हणून त्यांची सुरुवात कालकुंद्री केंद्रातून झाली होती. अध्यात्मिक प्रवचनकार म्हणून परिचित असलेल्या आंबेवाडकर यांच्या प्रेरणेतूनच कुदनूर गावातील सिद्धेश्वर मंदिरात ३५ वर्षांपूर्वी अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला होता. तो आजही मोठ्या भक्ती भावाने साजरा केला जातो.
एक शिस्तप्रिय शिक्षक व कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. सध्या काही दिवसांपासून कंग्राळी बेळगाव येथे वास्तव्यास होते. त्यांच्यावर सदाशिवनगर- बेळगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.


No comments:
Post a Comment