निट्टूर येथे कला, क्रीडा व प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या व्यक्तींचा सन्मान - चंदगड लाईव्ह न्युज

09 September 2025

निट्टूर येथे कला, क्रीडा व प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या व्यक्तींचा सन्मान

निट्टूर येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या व्यक्तींमधील नागरदळे येथील कवी, लेखक शिवाजी पाटील यांचा सन्मान करताना मान्यवर.


कोवाड : सी एल वृत्तसेवा 
      निट्टूर येथील गणेश मंदिरामध्ये शिवम शैक्षणिक व सामाजिक संस्था राशिवडे बु ॥ (फौंडेशन ) व राष्ट्रीय कला संस्कृती संमेलन बेळगाव कै. रवळनाथ पवार फौंडेशन कोवाड यांच्यावतीने  विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.  
    लेखक, कवी, नाटककार, नाट्यदिग्दर्शक शिवाजी पाटील (नागरदळे), आयुष मंत्रालय येथे प्रशासकीय अधिकारी पदी नियुक्ती झालेबद्दल  एन. आर. पाटील (निट्टूर ), उदयोन्मुख कुस्तीगीर आकाश पुजारी (निट्टूर) आदींचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करणेत आला. यावेळी सरपंच गुलाब पाटील, के. के. पाटील, नामदेव ईश्वर पाटील, दिपक पवार, जीवन कुंभार, भरमु पाटील, रमेश पाटील, डॉ. किशोर पाटील अशोक पाटील, विश्वास पाटील, दत्ता लोहार, बबन मर्णहोळकर, चंबाना पुजारी  आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन गोविंद पाटील यांनी केले. शिवम संस्थेचे सल्लागार  कृष्णा बामणे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment