कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
महादेवराव बीएड कॉलेज, तुर्केवाडी अंतर्गत शालेय आंतरवासिता टप्पा २ चे शिबिर मामासाहेब लाड विद्यालय, ढोलगरवाडी येथे पार पडले. दि. ८ /९/२०२५ रोजी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेमध्ये पारंपरिक वेशभूषा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. साक्षरता दिनानिमित्त महिलांसाठी शिक्षणाची कवाडे खुली करणारे महात्मा ज्योतिराव फुले व आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
मुख्याध्यापक एन. जी. यळ्ळूरकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. छात्रमुख्यद्यापक महेश कांबळे यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टी. व्ही. सावंत यांनी केले. प्रास्ताविक सुजाता कांबळे यांनी केले. व कार्यक्रमाची पार्श्वभूमी तसेच वेशभूषा या विषयी ज्योती चरापले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी वेशभूषा आणि वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देण्यात आली. सोनाली पाटील यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment