राजगोळी गणेश मंडळाच्या लकी ड्रॉ बैलजोडीचे विजेते ठरले नागाप्पा मनवाडकर - चंदगड लाईव्ह न्युज

07 September 2025

राजगोळी गणेश मंडळाच्या लकी ड्रॉ बैलजोडीचे विजेते ठरले नागाप्पा मनवाडकर

 

लकी ड्रॉ भाग्यवंत विजेत्यांचीनावेवे घोषित करताना मान्यवर

कुदनूर : सचिन तांदळे / सी एल वृत्तसेवा 

    राजगोळी खुर्द येथील ओम गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सवात लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले होते. या लकी ड्रॉ चा निकाल नुकताच समारंभपूर्वक करण्यात आला. लक्ष्मण कडोलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी जि. प. सदस्य मल्लिकार्जुन मुगेरी हे होते. सूत्रसंचालन डॉक्टर सुहास धबाले यांनी केले. यावेळी गावातील पहिली महिला डॉक्टर म्हणून संजीवनी बंदुर्गे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. 

   यावेळी काढण्यात आलेल्या लकी ड्रॉ चे विजेते अनुक्रमे पुढील प्रमाणे पहिले बक्षीस बैलजोडी- नागाप्पा भरमा मनवाडकर (दिंडलकोप), दुसरे बक्षीस टीव्हीएस स्कूटर- महेश कुमार (बिहार), तिसरे बक्षीस पावर ट्रेलर- मारुती ज्योतिबा माने (तिरमाळ), चौथे बक्षीस- सोन्याची अंगठी लक्ष्मी इराप्पा कुंभार (राजगोळी खुर्द), पाचवे बक्षीस लॅपटॉप रामा आप्पूणी पाटील (किटवाड), सहावे बक्षीस फ्रीज- तेजस शिवाजी मुतकेकर (कुदनूर), पिठाची गिरणी- मानस प्रल्हाद केळोजी (मोदगे), कुलर- तेजस ओमानी गुरव (राजगोळी बुद्रुक), सायकल- यलजा यल्लाप्पा मासेनट्टी (चन्नेहट्टी), डबल बॅटरी पंप- रेणुका गुंडू कोरे (कागणी), स्टॅन्ड फॅन- नारायण निंगाप्पा पाटील (राजगोळी बुद्रुक), याशिवाय लक्की ड्रॉ बक्षिसाचे मानकरी सौ अन्वी अजित तळगुळे (तळगुळी) यांना चांदीची गणेश मूर्ती बक्षीस मिळाली.

  यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष राहुल तोडले, इरापा कडोलकर, महादेव धुळे, बसवानी भांदुर्गे, विठ्ठल शिंदे, शिवाजी तोंडले, महालिंग गस्ती, बबन कडोलकर, सुदर्शन सोलापूर,विट्ठल गुरव, शिवाजी कडोलकर आदी उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment