कालकुंद्री येथे आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक जयंती विविध उपक्रमांनी साजरी - चंदगड लाईव्ह न्युज

07 September 2025

कालकुंद्री येथे आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक जयंती विविध उपक्रमांनी साजरी

 

कालकुंद्री येथे आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक जयंती कार्यक्रमात बोलताना सामाजिक कार्यकर्ते एम. जे. पाटील सोबत सरपंच छाया जोशी, उपसरपंच संभाजी पाटील व मान्यवर.

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

   कालकुंद्री (ता. चंदगड) येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक युवा मंडळ व बेरड रामोशी समाज यांच्या वतीने राजे उमाजी नाईक यांची २३४ वी जयंती अपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच छाया जोशी होत्या.

   कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी नाईक समाजातील महिला व मुलींनी उमाजी नाईक यांचे पोवाडे गायन करून कार्यक्रमाचा उत्साह वाढवला. कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष कल्लाप्पा रामू नाईक व उपाध्यक्ष कल्लाप्पा नागोजी नाईक यांनी केले. यावेळी प्रमुख वक्ते व चंदगड पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते एम. जे. पाटील, लेखक के. जे. पाटील, माजी तंटामुक्त कमिटी अध्यक्ष आर. आर. पाटील, होसुर विद्यालयाचे मुख्याध्यापक जे. एस. पाटील, ग्रामपंचायत सदस्य विलास शेटजी, उमाजी नाईक लेझीम पथकाचे प्रशिक्षक सुखदेव भातकांडे आदींनी मनोगते व्यक्त केली. यावेळी बेरड रामोशी समाजातील परदेश अभ्यास दौरा करून आलेले कंपनी अधिकारी लक्ष्मण शिवाजी नाईक व संदीप वैजनाथ नाईक, दहावी परीक्षेत मराठी विषयात उच्चांकी ९५ टक्के गुण घेतलेली श्रद्धा कलाप्पा नाईक, श्रुती विठ्ठल नाईक, सेवानिवृत्त माजी सैनिक व्हळ्याप्पा नाईक, वैजू नाईक आदींचा सन्मान करण्यात आला.

    यावेळी उपसरपंच संभाजी पाटील, सेवा संस्था चेअरमन अशोक पाटील, माजी सैनिक संघटना अध्यक्ष शरद जोशी, ग्राम पं. सदस्य प्रशांत मुतकेकर, सदस्या गीता पाटील, गीता नाईक यांच्यासह कल्लाप्पा कृष्णा नाईक, परसू नाईक, ईश्वर वर्पे, आजी-माजी सैनिक संघटनेचे सदस्य व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मंडळाचे सचिव सुरेश नाईक यांनी मानले.

No comments:

Post a Comment