कालकुंद्री येथील छकडा गाडी ओढण्याच्या स्पर्धेत ब्रह्मानंद पाटील, आर्यन कोकितकर, राजेंद्र मुतकेकर प्रथम - चंदगड लाईव्ह न्युज

05 October 2025

कालकुंद्री येथील छकडा गाडी ओढण्याच्या स्पर्धेत ब्रह्मानंद पाटील, आर्यन कोकितकर, राजेंद्र मुतकेकर प्रथम

  


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

     कालकुंद्री येथे सालाबाद प्रमाणे होणाऱ्या दसरा क्रीडा महोत्सवातील छकडा गाडी ओढण्याच्या स्पर्धा तीन गटात पार पडल्या. कलमेश्वर मंडळ आयोजित एका व्यक्तीने ३० सेकंदात गाडी पळवण्याच्या स्पर्धेचे उद्घाटन सेवा संस्था चेअरमन अशोक पाटील, सरपंच छाया जोशी, उपसरपंच संभाजी पाटील, अनिल पाटील आदींच्या उपस्थितीत पार पडले. 

      स्पर्धेतील विजेते व त्यांनी ओढलेले अंतर फुटात अनुक्रमे पुढील प्रमाणे खुला गट ब्रम्हानंद धोंडीबा पाटील (४६७), गोकुळ मारुती पाटील (४२९), अपूर्व विलास कोकितकर (४००), मारुती तातोबा तेऊरवाडकर, स्वराज प्रकाश पाटील, संदीप नरसु पाटील कलागाते. मध्यम गट इयत्ता ६वी ते ९वी आर्यन किरण कोकितकर (३४२), तेजस मारुती सावंत (२९३), पवन पांडुरंग कदम (२८१), ओमकार कल्लाप्पा बागीलगेकर, संग्राम सुधीर कोले, पृथ्वीराज तेऊरवाडकर. लहानगट इयत्ता १ली ते ५वी  राजेंद्र अशोक मुतकेकर (२६७), स्वरूप धनाजी पाटील (२५९), आरुष विजय पाटील (२५६), निखिल मोहन पाटील, समर्थ तुकाराम पाटील, सुशांत महादेव पाटील. विजेत्या सर्व स्पर्धकांना मंडळामार्फत वस्तू रुपात बक्षीस तसेच अनिल पाटील यांच्या वतीने ट्रॉफी तर जॉर्ज क्रूज यांच्याकडून लोकराज्य शाहू यांचे पुस्तक बक्षीस म्हणून देण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी पांडुरंग कदम, परशराम नाईक, गजानन मोरे, धनाजी पाटील, कल्लाप्पा पाटील लादेन, कल्लाप्पा कांबळे, आनंद गोविंद पाटील, जयवंत पाटील, रवळू बागिलगेकर, नारायण पाटील, मोहन नाईक, विवेक पाटील, गंगाराम गडकरी आदींनी परिश्रम घेतले. कालकुंद्री येथे विजयादशमी पासून पाच दिवस चालणाऱ्या दसरा क्रीडा महोत्सवात माणसाने छकडा गाडी ओढण्याच्या स्पर्धेसह कबड्डी, क्रिकेट, रस्सीखेच, बैलगाडी, विविध गटातील मॅरेथॉन आदी स्पर्धांचे आयोजन केले जाते.

No comments:

Post a Comment