खळणेकरवाडी (ता. चंदगड) येथील धोकादायक इमारत.
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
नागवे, इनाम कोळींद्रे, श्रीपादवाडी व खळणेकरवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या खळणेकरवाडी (ता. चंदगड) येथील १ ली ते ४ थी शाळेची इमारत धोकादायक असल्याने विद्यार्थ्यी मंदिरात घेताहेत ज्ञानदानाचे धडे. शाळेची इमारत नादुरुस्त असून अंगणवाडीला इमारत नसल्याने विद्यार्थांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष देऊन शाळा व अंगणवाडी यांची इमारत बांधून विद्यार्थ्यांची गैरसोय दुर करावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य संदिप गावडे गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे.
खळणेकरवाडी ग्रुप ग्राम पंचायत नागवे इनाम कोळिंद्रेमध्ये येत असून १ ली ते ४ थी पर्यंत शाळा आहे. प्राथमिक शाळेची इमारत धोकादायक बनली आहे. त्यामुळे सद्यस्थितीला १ ली ते ४ थी पर्यंतची प्राथमिक शाळा हि मंदिरात भरवली जात आहे. जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या फंडातून हि शाळा नविन बांधणे गरजेचे आहे. याबाबत ग्रामस्थांनी गावसभेमध्ये तक्रार दिल्या आहेत. सदर शाळेसाठी जागा उपलब्ध असूनही इमारत नाही. जिल्हा परिषद शाळा टिकली पाहिजे, जेणेकरुन विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. याचा विचार करता शाळेची पाहणी करून नविन इमारत बांधकाम करावे अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य संदिप गावडे यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment