चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
हेरे (ता. चंदगड) येथील रहिवाशी रमाकांत लक्ष्मण गावडे (वय ४३) यांना पोलीस स्टेशन चंदगड यांच्या प्रस्तावावरून दाखल गुन्ह्यांचा विचार करून उपविभागीय दंडाधिकारी गडहिंग्लज यांनी एक वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई केली आहे. ही कारवाई आज दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी आदेशान्वये करण्यात आली. अशी माहिती पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी दिली आहे.
सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणे, दहशत पसरविणे, सरकारी अधिकारी कर्मचारी यांना शिवीगाळ करणे, दमदाटी करणे, मारहाण करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, मानसिक छळ करणे, विनयभंग करणे अशा बाबींवर पोलिसांनी गावडे यांच्यावर सन २०१६ पासून २०२४ अखेर सात दखलपत्र व आठ अदखलपात्र गुन्हे दाखल केले आहेत.
गावडे हे त्यांच्यावर दाखल वरील गुन्ह्यांच्या सुनावणी साठी कधीही न्यायालयात हजर राहिले नाहीत. त्यामुळे त्यांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. असा निष्कर्ष काढण्यात आला. असे आदेशात म्हटले आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (१) (अ ) (ब) नुसार उपविभागीय दंडाधिकारी एकनाथ काळबांडे यांनी वरील आदेश काढला आहे.
गावडे ज्या तारखेपासून जिल्ह्याच्या बाहेर जातील त्या दिवसापासून एक वर्ष हद्यापारी राहणार असून प्रत्येक महिन्यातून एकदा जवळच्या पोलीस ठाण्यात आपण राहत असलेले ठिकाण कळविणे बंधनकारक राहणार आहे. पर राज्यात गेल्यास गेल्यापासून दहा दिवसात अशा पोलीस स्टेशनमध्ये दहा दिवसात कळवणे गरजेचे आहे असे आदेशात म्हटले आहे.
कारवाई करताना पोलीस निरीक्षक विश्वास पाटील व चंदगड पोलीस पथक

No comments:
Post a Comment