राष्ट्रवादी कुदनुर जि. प. व पं. स. उमेदवारांना सुंडी येथे मतदारांचा प्रतिसाद, प्रचाराला वेग - चंदगड लाईव्ह न्युज

03 February 2026

राष्ट्रवादी कुदनुर जि. प. व पं. स. उमेदवारांना सुंडी येथे मतदारांचा प्रतिसाद, प्रचाराला वेग

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

     सुंडी (ता. चंदगड) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने प्रचार दौरा काढण्यात आला. राष्ट्रवादीच्या वतीने निवडणुक रिंगणात असलेल्या कुदनूर जिल्हा परिषदेच्या उमेदवार विद्याताई पाटील व तुर्केवाडी पंचायत समिती गणाचे उमेदवार पांडुरंग बेनके यांच्या प्रचारार्थ हा प्रचार दौरा काढण्यात आला. याला मतदारांनी उत्तम प्रतिसाद दिला. प्रचार अंतिम टप्यात आल्याने प्रचाराला वेग आला आहे. 

       या प्रचार दौऱ्या दरम्यान माजी आमदार राजेश पाटील यांचे सुपुत्र निखिल राजेश पाटील यांनी गावकऱ्यांशी थेट संवाद साधत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विकासाभिमुख धोरणांची माहिती दिली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ‘घड्याळ्याला’ मत देण्याचे त्यांनी मतदारांना आवाहन केले. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी अनुभवी आणि जनतेशी नाळ जोडलेले नेतृत्व आवश्यक आहे. विद्याताई पाटील व पांडुरंग बेनके हे त्या दृष्टीने योग्य उमेदवार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रचार दौऱ्यात महिलांचा, युवकांचा तसेच ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला. 

    यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचार दौऱ्यामुळे सुंडी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला चांगलीच धार मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

No comments:

Post a Comment