![]() |
| मच्छे : जयभारत सोसायटीचे चेअरमन व डीलर्स गंगाधर लाड यांच्याकडे कुपन बूक देताना प्रकाश डोळेकर. शेजारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन शिवाजी पाटील व अन्य संचालक मंडळ |
बेळगाव : सी एल वृत्तसेवा
उद्यमबाग येथील कलाश्री उद्योगसमूहातर्फे ग्राहकांच्यासाठी बक्षिस योजना सुरु आहे. कलाश्री समूहाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ५ व्या बक्षीस योजनेला मच्छे परिसरातून ग्राहकांचा चांगला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मच्छे येथील जयभारत क्रेडिट सोसायटीमध्ये नुकताच नव्या सदस्यांना नोंदणी पत्र व कुपन बुकचे वितरण करण्यात आले.
मच्छे येथील जय भारत सोसायटीचे चेअरमन व कलाश्री योजनेचे डीलर्स गंगाधर लाड यांच्याकडे कुपन बुक देण्यात आले. यावेळी व्हाईस चेअरमन शिवाजी पाटील, आशिषकुमार, मालजी पाटील, पारिश कोलकार, सोसायटीचे संचालक जोतिबा डुकरे, अशोक लाड, जयपाल चौगुले, शांता डेळेकर, विष्णू सुतार, महादेव करेन्नावर यांच्या उपस्थितीत नव्या सदस्यांना नोंदणी पत्र देण्यात आले. यावेळी कलाश्री ग्रुपचे चेअरमन प्रकाश डोळेकर, संचालिका सुकन्या डोळेकर यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या योजनेत ५०० रुपये भरून सदस्य नोंदणी होता येते. यानंतर झालेल्या सोडत मध्ये मुख्य विजेत्याला पहिले बक्षीस ट्रॅक्टर व रोख दीड लाख रुपये, दुसरे बक्षीस कार व दीड लाख रुपये रोख, 21 वे बक्षीस 50 हजार रुपयांच्या ठेवीवर एक लाख रुपयांची पाच वर्षे नऊ महिन्यांसाठी कलाश्री क्रेडिट सोसायटीची ठेव पावती ठेव पावती बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.

No comments:
Post a Comment