चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
खेडूत शिक्षण संस्थेच्या न. भु. पाटील ज्युनि. कॉलेज चंदगड व गुरुवर्य म. भ. तुपारे ज्युनि. कॉलेज कार्वेचा सुवर्णमहोत्सवी समारंभ रविवार दि. १५ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता गुरुवर्य एस. एन. पाटील सभागृह चंदगड येथे आयोजित केला आहे.
दै. लोकमत पुणे आवृत्तीचे संपादक संजय आवटे हे प्रमुख पाहुणे आहेत. संस्थेचे ऑडीटर ॲड. एन. एस. पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रहातील. खेडूतचे संचालक प्रा. आर. पी. पाटील हे स्वागताध्यक्ष आहेत.
माजी प्राचार्य के. एस. पुजारी, माजी कार्याध्यक्ष अविनाश तळेकर, प्रा. आर. बी. गावडे, प्रा. संजय मोरे, माजी सचिव सी. एम. गायकवाड, शिवाजीराव होडगे, अभिजित दुर्गी व सचिव प्रा. बी. एस. पाटील हे प्रमुख उपस्थित रहाणार आहेत. यांच्यासह खेडूत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जी. एस. पाटील, उपाध्यक्ष एल. डी. कांबळे, सचिव एम. एम. तुपारे, खजिनदार ए. व्ही. सुतार, एन. के. पाटील, बी. बी. पाटील, एम. बी. पाटील, एस. एम. फर्नांडीस, आर. बी. पाटील, व्ही. डी. सडेकर, एस. व्ही. मुरकुटे, के. एस. माळवे व प्रा. डॉ. पी. आर. पाटील हे देखील उपस्थित रहाणार आहेत.
न. भु. पाटील ज्युनि. कॉलेज चंदगड व गुरुवर्य म. भ. तुपारे ज्युनि. कॉलेज कार्वे यांनी या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले आहे. सर्वांनी या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन प्राचार्य आर. पी. पाटील व एन. डी. देवळे यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment