म्हाळेवाडीत 'शिवाजी कोण होता' पुस्तकाचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

04 May 2026

म्हाळेवाडीत 'शिवाजी कोण होता' पुस्तकाचे वाटप

 


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

    म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथे कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित 'शिवाजी कोण होता' या ऐतिहासिक व प्रेरणादायी पुस्तकाचे मोफत वाटप अभिजीत कांबळे यांच्या द्वारें करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य तरुण पिढीपर्यंत पोहोचावे यासाठी महाराष्ट्र दिन, कामगार दिन, बुद्ध जयंती तसेच सरपंच सी. ए. पाटील यांच्या वाढदिवसाचे  औचित्य साधून या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. 

   छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना अभिजीत कांबळे यांनी छ. शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्थापनेतील योगदान, शौर्य व नेतृत्वगुण याविषयी भाषण केले. अशा उपक्रमांमुळे युवकांमध्ये इतिहासाची आवड निर्माण होऊन राष्ट्रभक्तीची भावना दृढ होईल असा विश्वास व्यक्त केला. 'शिवाजी कोण होता?'  हे पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी सरपंच सी. ए. पाटील, उपसरपंच विजय मर्णहोळकर, पी. एस. कांबळे, डी. एस. कांबळे, मुख्याध्यापक एम. आय. कांबळे, निगांप्पा दळवी, बाळकृष्ण गणाचारी, विजय गावडे, नारायण गडकरी, व्ही. एन. नाईक, अंगणवाडी सेविका शोभा पाटील, आनंदी कांबळे, माधवी कांबळे ग्रा. प. सदस्या अमृता कांबळे,  रमेश पाटील. दिलीप पाटील, ग्रामस्थ व  विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:

Post a Comment