साहित्यिक कल्लापा पाटील यांच्या 'चांदणी' कथासंग्रहाला वाड्मय चर्चा मंडळाचा पुरस्कार - चंदगड लाईव्ह न्युज

26 May 2026

साहित्यिक कल्लापा पाटील यांच्या 'चांदणी' कथासंग्रहाला वाड्मय चर्चा मंडळाचा पुरस्कार

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

  कालकुंद्री, (ता. चंदगड) येथील प्राथमिक शिक्षक व साहित्यिक कल्लापा जोतीबा पाटील यांच्या 'चांदणी' कथासंग्रहाला वाड़मय चर्चा मंडळ बेळगांव कडून दिला जाणारा "वि. ना. मिसाळ  साहित्य पुरस्कार" डॉ. सागर देशपांडे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. टिळकवाडी- बेळगाव येथील वरेरकर नाट्यसंघाच्या लोकमान्य ग्रंथालयात पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पडला. यावेळी वाड़मय चर्चा मंडळाचे कार्याध्यक्ष प्रा.अनिल पाटणेकर, उपाध्यक्ष विजय देशपांडे, जगदीश कुंटे, माधव कुंटे, स्वाती कुलकर्णी, निता कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.          कल्लापा पाटील यांच्या 'चांदणी' कथासंग्रहाला करवीर साहित्य परिषद कोल्हापूर यांचा 'करवीर साहित्य पुरस्कार',   प्रा. रसूल सोलापूरे बहुउद्देशीय संस्था, महागाव, गडहिंग्लज या संस्थेचा 'उत्कृष्ट कथासंग्रह साहित्य पुरस्कार' व वाड़मय चर्चा मंडळ, बेळगांव यांचा 'वि. ना. मिसाळ साहित्य पुरस्कार आदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment