चंदगड : सी एल वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण टोकाला असलेल्या चंदगड तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसा सुरू असलेल्या संतत धार पावसामुळे तालुक्यातील ताम्रपर्णी व घटप्रभा या दोन्ही नद्यांच्या पातळीत मोठी वाढ होत आहे. दरम्यान घटप्रभा नदीवर फाटकवडी येथे बांधण्यात आलेल्या मध्यम प्रकल्प पाटबंधारे प्रकल्प आज शनिवार दिनांक ४ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ वाजता झाला. गेल्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये हे धरण 18 जूनला झाले होते तर 2024 मध्ये जूनच्या पहिल्याच आठवड्यात ओव्हर फ्लो झाले होते. यंदा पावसाने बऱ्यापैकी ओढ दिल्यामुळे जून महिना जवळपास कोरडाच गेला तथापि जून च्या अखेरीस व जुलै च्या पहिल्या तीन दिवसात पडलेल्या पावसामुळे फाटकवाडी प्रकल्प अखेर ओव्हरफ्लो झाला.
पश्चिमेकडील घाटमाथा च्या तुलनेत तालुक्याच्या पूर्व भागात पावसाचा जोर दिवसात कमी असला तरी पश्चिम भागात तो कायम आहे. परिणामी आज घटप्रभा नदीवरील फाटकवाडी धरण ओव्हरफ्लो झाले.
आठ दिवस सुरू असलेल्या पावसामुळे ठिक- ठिकाणचे ओढे, नाले, तलावांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. काल संध्याकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे तालुक्यातील जांबरे व जंगमहट्टी प्रकल्पांच्या पाणी पातळीतही वाढ झाली. गतवर्षी महाराष्ट्रात प्रथम भरण्याचा मान फाटकवाडी धरणाने पटकावला होता मात्र यावर्षी फाटकवडीचा दुसरा क्रमांक लागला आहे. यावर्षी हा मान लोणावळा जवळील भुशी धरणाला मिळाला आहे.
चंदगड आणि गडहिंग्लज तालुक्यातील गावांना वरदान असलेला हा प्रकल्प नेहमी पहिल्याच पावसात भरतो. या प्रकल्पामुळे चंदगड तालुक्यातील २८ गडहिंग्लज तालुक्यातील १४ गावातील शेकडो हेक्टर शेतजमिनीला आणि बऱ्याच गावच्या पिण्या्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. याबरोबरच या प्रकल्पातील पाण्यावर दररोज ८ मेगावँट वीजनिर्मितीही केली जाते. प्रकल्प पूर्ण भरल्यानंतर सांडव्यातून मोठ्या उंचीवरुन पडणाऱ्या पाण्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकही या ठिकाणी मोठ्या संख्येने हजेरी लावतात.
झांबरे व जंगमहट्टी प्रकल्पात पाणी पातळी वाढली
दरम्यान चंदगड तालुक्याच्या पश्चिम व मध्यभागात सुरू असलेल्या संततदार गोष्टीमुळे तालुक्यातील झांबरे व जंगम हट्टी प्रकल्पातील पाण्याची पातळी वाढली आहे आज दिनांक चार जुलै रोजी सकाळी ७.०० वाजता जंगमहट्टी प्रकल्पात ३५.५८ तर झांबरे धरणात ४७.७०% इतका पाणीसाठा झाला आहे. अशी माहिती पाटबंधारे विभागाकडून कळवण्यात आली आहे.

No comments:
Post a Comment