![]() |
| कु. स्मितल संजय गावडे |
चंदगड / सी एल वृत्तसेवा
मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या इ. 8वी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत श्री. भावेश्वरी विद्यालय नांदवडे मधून कु. स्मितल संजय गावडे व कु. श्रेया अशोक गावडे या दोन विद्यार्थिनी प्रविष्ट झालेल्या होत्या. त्यापैकी कु. स्मितल संजय गावडे हिने शिष्यवृत्ती प्राप्त केली तर श्रेया अशोक गावडे ही पास होऊन पात्र झाली आहे.
या विद्यार्थिनीना मुख्याध्यापक यू. एल. पवार, अध्यापक डी. जी. पाटील, अध्यापिका सौ. एस. एस. कोरवी, अध्यापक जी. जी. सुतार, अध्यापक महादेव नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांना शालेय समिती चेअरमन रामाणा पाटील व सर्व शालेय समिती सदस्यांचे प्रोत्साहन लाभले.


No comments:
Post a Comment