
गोव्यातील चिखली ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना फळझाडांची रोपे वितरीत करताना तुलसीदास फळदेसाई व मान्यवर
पणजी : सी एल वृत्तसेवा
"वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" 'झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा' हा संदेश प्रत्यक्षात आणत दक्षिण गोव्यातील दाबोली मतदार संघातील होतकरू युवक व पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते तुळशीदास फळदेसाई यांनी गुरुवार दि. २३ जुलै २०२६ रोजी चिखली ग्रामीण रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांना औषधी गुणधर्म आणि फळांच्या झाडांचे वितरण केले.
सामाजसेवेचा वसा घेतलेले तुळशीदास फळदेसाई हे दाबोली मतदार संघात एक सक्रिय समाजसेवक म्हणून ओळखले जातात. मुरगाव शिगमोत्सव समिती, शिवजयंती उत्सव समिती आणि श्री दामोदर भजनी सप्ताह यांसारख्या विविध धार्मिक व सांस्कृतिक उत्सवांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यांच्या सामाजिक कार्याने प्रभावित झाल्यामुळे अनेक पर्यावरणवादी मित्र त्यांच्या कार्यात सहकार्यासाठी पुढे येताना दिसत आहेत. दाबोली मतदार संघात वन महोत्सव घडवून आणण्यात त्यांचा वाटा कौतुकास्पद आहे. चिखली ग्रामीण रुग्णालयात आयोजित या शानदार वनमहोत्सव सोहळ्यात वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजाता कामत यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना रोपांचे वितरण करण्यात आले. या पर्यावरणपूरक कार्यक्रमास फळदेसाई यांचे अनेक हितचिंतक व ग्रामस्थ आवर्जून उपस्थित होते.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि हरित दाबोलीच्या निर्मितीसाठी त्यांनी हाती घेतलेल्या या उपक्रपाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment