चंदगड : संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षपदी श्रीलक्ष्मी (भारती) जाधव निवड - चंदगड लाईव्ह न्युज

22 July 2026

चंदगड : संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षपदी श्रीलक्ष्मी (भारती) जाधव निवड

 श्रीलक्ष्मी (भारती) जाधव
चंदगड / प्रतिनिधी

    चंदगड तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सौ. श्रीलक्ष्मी (भारती) संजय जाधव (रा. वरगाव) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार ही नियुक्ती करण्यात आली असून, यामुळे तालुक्यातील निराधार, ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि दिव्यांग लाभार्थ्यांच्या विविध सामाजिक सुरक्षा योजनांतील प्रलंबित प्रस्तावांच्या मंजुरी प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

    यापूर्वी समितीचे अध्यक्ष लक्ष्मण विश्राम गावडे यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने काढलेल्या आदेशानुसार, आमदार शिवाजीराव पाटील यांनी अध्यक्षपदासह समितीतील बदलाबाबत केलेल्या शिफारशीचा विचार करण्यात आला. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने अध्यक्ष बदलास मंजुरी दिल्यानंतर सौ. श्रीलक्ष्मी (भारती) जाधव यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

    सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या सौ. जाधव यांच्या नियुक्तीचे विविध स्तरांतून स्वागत करण्यात येत असून, पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ वेळेत मिळण्यासाठी समिती अधिक प्रभावीपणे कार्य करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

No comments:

Post a Comment