सातवणे येथे ‘एक दिवस बळीराजासाठी’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण; राजश्रीताई गावडे यांच्या हस्ते शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

18 July 2026

सातवणे येथे ‘एक दिवस बळीराजासाठी’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण; राजश्रीताई गावडे यांच्या हस्ते शुभारंभ

 


चंदगड / प्रतिनिधी : 

    कृषी विभागाच्या ‘एक दिवस बळीराजासाठी’ या उपक्रमांतर्गत मौजे सातवणे (ता. चंदगड) येथील मराठी विद्या मंदिर परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. अडकूर जिल्हा परिषद मतदारसंघाच्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्या सौ. राजश्रीताई गावडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

    पर्यावरण संवर्धन, हरित परिसराची निर्मिती आणि बळीराजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला गावातील पदाधिकारी, शिक्षक, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

    यावेळी सरपंच विठ्ठल नारायण कांबळे, उपसरपंच संजय दत्तात्रय रेडेकर आणि ग्रामसेवक अभिषेक गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती.

    कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष परशराम कडते, मराठी विद्या मंदिर सातवणेचे मुख्याध्यापक रेणू बच्चाराम कांबळे, हणमन मारुती नाईक, राजेंद्र हिंडोळे, मोहन गाडीवडर, लीला सुतार, कल्पना पिलारे, अलका पाटील, तुषार भाग्यवान, बाबू रेडेकर, किशोर पाटील, राजू गोंधळे, प्रमोद निकम, एकनाथ माने, जॉन डिसोझा तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

    कार्यक्रमाच्या समारोपावेळी पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. ग्रामपंचायत सातवणेच्या वतीने उपस्थित मान्यवर, शिक्षक, ग्रामस्थ आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानण्यात आले.

No comments:

Post a Comment