चंदगड, प्रतिनिधी :
दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने पोवाचीवाडी येथील मराठी शाळेत विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन व आवश्यक मदत मिळावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दुर्गवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष हसुरकर होते. प्रमुख अतिथी म्हणून संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष लक्ष्मण गावडे तसेच भाजप चंदगड विधानसभा संयोजिका भारती जाधव उपस्थित होत्या. यावेळी प्रतिष्ठानचे संदीप गावडे, कृष्णा सुप्पल, ज्ञानेश्वर बोकडे आणि दिगंबर भाटे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक महादेव नाईक, शिक्षिका मंगल नाईक, माजी उपसरपंच अरुण मातवंडकर, श्रीराम दूध संस्थेचे डेप्युटी चेअरमन आनंद पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल घवाळे, मोहन पेडणेकर, गणेश मातवंडकर, संतोष मातवंडकर, विष्णू कोंडुसकर, गणू हजाम, रमेश गुरव, नरेश मातवंडकर, भगवंत मातवंडकर, प्रकाश शहापूरकर, चंद्रकांत सुतार, विठोबा मातवंडकर, नागोजी पाटील, अशोक सुतार (ग्रामपंचायत सदस्य) आणि पुंडलिक मातवंडकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते शाळेतील गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना वह्या, दप्तर आणि इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देत वेळेचे नियोजन करून जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर यश संपादन करावे, असा संदेश मान्यवरांनी दिला.
या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती तसेच पोवाचीवाडी ग्रामस्थांनी दुर्गवीर प्रतिष्ठानचे आभार मानले. कार्यक्रमास पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment