चंदगड / प्रतिनिधी :
अडकूर मतदारसंघाच्या जिल्हा परिषद सदस्या सौ. राजश्री लक्ष्मण गावडे यांच्या जिल्हा परिषद निधीतून मंजूर झालेल्या पिळणी व अपुटहोळवाडी (ता. चंदगड) येथील स्मशान शेड बांधकामाचे भूमिपूजन नुकतेच उत्साहात संपन्न झाले. या विकासकामामुळे दोन्ही गावांतील ग्रामस्थांची अनेक वर्षांपासूनची स्मशान शेडची मागणी पूर्ण होणार आहे.
भूमिपूजन कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य संयोजक (भाजप सेवा उद्योग समिती) लक्ष्मण विश्राम गावडे, चंदगड विधानसभा मतदारसंघ विस्तारक अशोक गडदे, माजी सरपंच गुंडूपंत कबाडी, युवा नेतृत्व विशाल गावडे, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम कांबळे, मधुकर गावडे, ग्रामसेवक पाटील, शिपाई रमेश कदम, जे. एम. शेखर, सामाजिक कार्यकर्ते कानुर, संदीप झेंडे, बाळाजी पाटील, सागर सुभेदार, संजय मोरे, लक्ष्मण मटकर, संजय नाईक यांच्यासह पिळणी व अपुटहोळवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी तुकाराम गावडे, वसंत बुवा, देमा गावडे, सखाराम गावडे, विष्णू गावडे, गोविंद गावडे, नामदेव गावडे, नारायण बिजुरकर, बाबू गावडे, मधुकर कांबळे, गोपाळ गावडे, संजय गावडे, मनोहर गावडे, अनंत गावडे, प्रकाश बुवा, तानाजी बिजुरकर, बालाजी सांगेलकर आदी ग्रामस्थांची उपस्थिती लाभली.
अडकूर मतदारसंघातील गावांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी सौ. राजश्री गावडे सातत्याने प्रयत्नशील असून, त्यांच्या निधीतून विविध विकासकामे राबविली जात आहेत. पिळणी व अपुटहोळवाडी येथील स्मशान शेडचे काम मंजूर झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत सौ. राजश्री गावडे यांचे आभार मानले. कार्यक्रमास स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

No comments:
Post a Comment