![]() |
| शिवाजी कल्लापा नार्वेकर |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
तुडये (ता. चंदगड) गावचे रहिवासी सेवानिवृत्त शिक्षक शिवाजी कल्लापा नार्वेकर वय ६३ यांचे आज दि. ४/८/२०२६ रोजी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. ३० जून २०२१ रोजी ते सेवानिवृत्त झाले होते. चंदगड तालुक्यातील म्हाळुंगे खालसा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत त्यांनी अनेक वर्षे ज्ञानदानाचे कार्य केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगी, जावई व दोन चिरंजीव असा परिवार आहे. महाराष्ट्र मुंबई पोलीस दलात नुकतेच भरती झालेले शुभम नार्वेकर यांचे ते वडील होत.

No comments:
Post a Comment