
आग्रा येथील कार्यक्रमात 'शिवशौर्य' नाट्य प्रयोग सादर करण्यासाठी रवाना होणाऱ्या ताळगाव गोवा येथील महिला व बाल कलाकारांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या मान्यवरांचे कलाकारांसोबत घेतलेले छायाचित्र
पणजी : सी एल वृत्तसेवा
"ताळगावच्या मानकुल्या बुरग्यांची उंच भरारी...!" हे गौरवोद्गार आहेत गोव्यातील ताळगावच्या सरपंच श्रीमती मारिया फर्नांडिस यांचे. निमित्य होते आग्रा येथील गरुडझेप मोहिमेच्या निमित्ताने शिवचातुर्य दिनानिमित्त आग्रा येथे "शिवशौर्य" हा नाट्यप्रयोग सादर करण्यासाठी निघालेल्या ताळगावच्या तब्बल ६० महिला आणि विद्यार्थिनींना शुभेच्छा देण्याचे.
औरंगजेब बादशहाच्या तवडीतून नजर कैदेतून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बुद्धीच्या तुर्याने 17 ऑगस्ट सोळाशे 66 या दिवशी आपली सुटका करून घेतली. या घटनेच्या स्मृतिप्रत्यर्थ दरवर्षी आग्रा येथे शिवछत्रिय दिन साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर हे पथक महिलांचे नाट्यपथक आग्रा येथे रवाना होत आहे त्यानिमित्त ओम शिव देवालय सभागृहात आयोजित कार्यक्रमात कलाकारांना निरोप शुभेच्छा देण्यात आल्या. महाराष्ट्र मंडळ गोवा आणि ओमिडा डान्स आणि फिटनेस अकादमी ताळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक ३ ऑगस्ट २०२६ रोजी या प्रेरणादायी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात उपस्थित होते. अध्यक्षस्थानी ताळगावच्या सरपंच श्रीमती मारिया फर्नांडिस होत्या. याशिवाय ताळगाव मतदारसंघाचे अध्यक्ष विवेक भंडारी, महाराष्ट्र मंडळ गोव्याचे अध्यक्ष अनिल पाटील, ओम शिव मंदिर अध्यक्ष सुनहरीलाल कुशवाहा, कोषाध्यक्ष चंद्रकांत कुंकळकर, गोवा शिपयार्ड लि. वास्कोचे प्रशासकीय अधिकारी राजेन्द्र केरकर, श्री दत्तात्रेय समाज मंदिर सडा (मुरगाव) चे अजित कांबळी, गरुडझेप मोहीमचे गोवा प्रदेशाध्यक्ष राजाराम पाटील, ओमिडा डान्स अँड फिटनेस अकादमीच्या दिग्दर्शिका श्रीमती अंजू राजपूत देसाई आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment