बिहारचे माजी राज्यपाल, कोल्हापूरचे माजी नगराध्यक्ष व पन्हाळ्याचे माजी आमदार पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

04 August 2026

बिहारचे माजी राज्यपाल, कोल्हापूरचे माजी नगराध्यक्ष व पन्हाळ्याचे माजी आमदार पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन

 

डॉ. डी. वाय. पाटील

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

   बिहार, पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा राज्यांचे राज्यपाल म्हणून काम पाहिलेले शिक्षण महर्षी पद्मश्री डॉ ज्ञानदेव यशवंतराव पाटील तथा डी. वाय. पाटील यांचे आज मंगळवार दिनांक ४ ऑगस्ट २०२६ रोजी ९१ व्या वर्षी निधन झाले. राष्ट्रीय काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाचे नेते, जिल्हाध्यक्ष व माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांचे वडील होत.

   डी. वाय. पाटील यांनी शिक्षण क्षेत्राच्या उन्नतीसाठी भरीव योगदान दिले आहे. त्यानी निर्माण केलेल्या शिक्षण संस्था कोल्हापूर, महाराष्ट्र व देशाच्या विविध भागात कार्यरत असून तरुण-तरुणींसाठी सर्व प्रकारच्या उच्च शिक्षणाची द्वारे खुली केली आहेत. डी. वाय. पाटील यांनी सन १९५५७ ते १९६२ या काळात कोल्हापूर शहराचे नगराध्यक्ष म्हणून कार्य केले होते. तर १९६७ मध्ये ते पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी उभे केलेल्या शैक्षणिक विश्वाचे वटवृक्षात रूपांतर झाले असून डी. वाय. पाटील हा देशभरात मोठा ब्रँड ठरला आहे. डी. वाय. पाटील यांना त्यांच्या शिक्षण व समाजकार्यासाठी भारत सरकारने १९९१ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रासह देशातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

No comments:

Post a Comment