हलकर्णी फाटा येथे कृषितेज ऑटोमोबाईल्सतर्फे ‘स्वराज 855 FE PROTEK’चा शनिवारी शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

10 September 2026

हलकर्णी फाटा येथे कृषितेज ऑटोमोबाईल्सतर्फे ‘स्वराज 855 FE PROTEK’चा शनिवारी शुभारंभ


                                        

चंदगड : प्रतिनिधी

    चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची नवी पर्वणी ठरणाऱ्या ‘स्वराज 855 FE PROTEK’ या अत्याधुनिक ट्रॅक्टरचे भव्य लॉन्चिंग सोहळा कृषितेज ऑटोमोबाईल्स, हलकर्णी फाटा येथे आयोजित करण्यात आला आहे. शनिवार, दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

    कृषितेज ऑटोमोबाईल्सच्या सौजन्याने आयोजित या सोहळ्यास चंदगड तालुक्यातील शेतकरी बांधव, ग्राहक व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. ‘स्वराज 855 FE PROTEK’ या ट्रॅक्टरची अत्याधुनिक वैशिष्ट्ये, दमदार क्षमता आणि उत्कृष्ट कार्यक्षमता यांचा प्रत्यक्ष अनुभव या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेता येणार आहे.

        माजी आमदार राजेश नरसिंगराव पाटील व भरमाणा गावडे यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. तसेच स्वराज महाराष्ट्रचे स्टेट हेड हिमांशु गुप्ता, एरिया मॅनेजर शुभम अग्रवाल व टेरिटरी मॅनेजर स्वप्निल राऊत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

        कार्यक्रमास जिल्हा परिषद व पंचायत समितीचे पदाधिकारी, सदस्य तसेच विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमानंतर दुपारी १ वाजता स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.

    कृषितेज ऑटोमोबाईल्स, बेळगाव–वेंगुर्ला रोड, हलकर्णी फाटा, ता. चंदगड यांच्या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमासाठी चंदगड तालुक्यातील शेतकरी बांधवांनी या भव्य लॉन्चिंग सोहळ्यास उपस्थित राहून ‘स्वराज 855 FE PROTEK’च्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा, असे आवाहन कृषितेज ऑटोमोबाईल्सतर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment