नेसरी / सी एल वृत्तसेवा
विद्या मंदिर अर्जुनवाडी (ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापू)र येथे माजी विद्यार्थी संघटना व शिक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शाळा व विद्यार्थी सर्वांगीण विकास आणि शाळेची पटसंख्या वाढ’ या विषयावर सविचार चर्चासत्र उत्साहात पार पडले.
यावेळी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, बौद्धिक, क्रीडा व सांस्कृतिक विकास, तसेच शाळेची गुणवत्ता आणि वाढती पटसंख्या यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सखोल चर्चा करण्यात आली. माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या विकासासाठी सक्रिय सहभाग व सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षक, माजी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ यांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली. चर्चासत्रास शिक्षक व माजी विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

No comments:
Post a Comment