![]() |
| सभेत बोलताना सभापती विलास नाईक, शेजारी उपसभापती सौ. संज्योती मळवीकर, सरपंच राजेंद्र कांबळे, उपसरपंच नारायण पाटील व इतर मान्यवर. |
चंदगड : प्रतिनिधी
नांदवडे (ता. चंदगड) गावामध्ये प्रगती ग्राम संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. यावेळी तालुका पंचायत समितीचे सभापती विलास नाईक, उपसभापती सौ. संज्योती मळवीकर या प्रमुख उपस्थित होत्या.
प्रभाग संघाच्या माध्यमातून प्रगती ग्राम संघाला प्राप्त झालेल्या फूड ट्रॉलीचे उद्घाटन सभापती विलास नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्राम संघातील महिलांना व्यवसायाच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. उपसभापती सौ. संज्योती मळवीकर यांनीही मार्गदर्शन केले.
सभेस सरपंच राजेंद्र कांबळे, उपसरपंच नारायण पाटील, माजी सैनिक मेजर भरत पाटील यांच्यासह ग्राम संघाचे पदाधिकारी तसेच विविध समूहांचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते.
सभेचे सूत्रसंचालन कविता विजय शिंदे यांनी केले. तनुजा खेमानाथ कुंडेकर यांनी ग्राम संघाचा वार्षिक अहवाल वाचन करून वर्षभरातील उपक्रम व कामकाजाचा आढावा सादर केला. समीक्षा सुतार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी ग्राम संघाच्या आगामी उपक्रमांबाबत तसेच महिला बचत गटांच्या माध्यमातून विविध व्यवसायांना चालना देण्याबाबत चर्चा करण्यात आली.

No comments:
Post a Comment