चंदगड : प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठाच्या वतीने विविध महाविद्यालयांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या नियतकालिकांच्या स्पर्धेत चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने उल्लेखनीय यश संपादन केले. महाविद्यालयातील विद्यार्थी अक्षय कांबळे याने लिहिलेल्या माहितीपूर्ण लेखास प्रथम क्रमांकाचे ५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र प्राप्त झाले.
कला शाखेत मराठी विभागाचे शिक्षण घेत असलेल्या अक्षय कांबळे याने ‘चंदगडचा शिमगोत्सव – एक अनोखी परंपरा’ या विषयावर लेख लिहिला होता. या लेखातून चंदगडच्या शिमगा उत्सवाचे वेगळेपण, त्यावर असलेला कोकणातील शिमगोत्सवाचा प्रभाव तसेच स्थानिक समृद्ध लोकपरंपरा यांची अभ्यासपूर्ण मांडणी करण्यात आली होती.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एम. एम. माने यांच्या हस्ते अक्षय कांबळे याचा सत्कार करण्यात आला. यावेळी नियतकालिकाचे संपादक व मार्गदर्शक प्रा. एस. के. कुलकर्णी, डॉ. आर. के. तेलगोटे, डॉ. आर. ए. कमलाकर, डॉ. पी. एल. भादवणकर, डॉ. एस. एस. सावंत, डॉ. मोहन घोडसे, डॉ. जी. वाय. कांबळे, डॉ. ए. वाय. जाधव, डॉ. पी. एल. भादवणकर, डॉ. एन. एस. मासाळ, प्रा. एस. एम. पाटील, डॉ. एस. एन. पाटील, डॉ. एन. के. पाटील, प्रा. व्ही. के. गाडवे, प्रा. ए. डी. कांबळे आदी उपस्थित होते.
उपस्थित प्राध्यापकांनी अक्षय कांबळेचे अभिनंदन करून त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या यशामुळे अक्षय कांबळे तसेच माडखोलकर महाविद्यालयाच्या ‘खेडूत नियतकालिकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:
Post a Comment