चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चन्नेटी व कामेवाडी परिसरातील शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य प्रवाशांची दैनंदिन प्रवासाची गैरसोय लक्षात घेऊन चन्नेटी–कामेवाडी मार्गे कोवाड बससेवा सुरू करण्यात आली आहे. आजपासून ही बससेवा प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली.
आमदार श्री. शिवाजीराव पाटील (भाऊ) यांच्या प्रयत्नातून ही बससेवा सुरू झाली आहे. या बससेवेमुळे परिसरातील विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात जाणे सुलभ होणार असून, ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ आणि सर्वसामान्य प्रवाशांना कोवाड येथे दैनंदिन कामांसाठी ये-जा करणे अधिक सोयीचे होणार आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षित, नियमित आणि सुलभ सार्वजनिक वाहतूक उपलब्ध व्हावी, या उद्देशाने बससेवेसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्याला यश मिळाल्याने परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
बससेवा सुरू करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या एसटी महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यात आले. या बससेवेमुळे चन्नेटी, कामेवाडी परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीची मोठी सोय होणार आहे.

No comments:
Post a Comment