चंदगड : प्रतिनिधी
सामाजिक वनीकरण विभाग, चंदगड यांच्या वतीने वन्यजीव सप्ताह २०२६ निमित्त विद्या मंदिर, जंगमहट्टी येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना वन्यजीव, पर्यावरण व निसर्ग संवर्धनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांनी विद्यार्थ्यांना वने, वन्यजीव, पर्यावरण, निसर्गचक्र, ऋतुचक्र तसेच अन्नसाखळी याबाबत सविस्तर माहिती दिली. वन्यजीव व निसर्गाचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी संस्कार, आत्मभान व संस्कृतीचे जतन करण्याबरोबरच आत्मनिर्भर आणि व्यसनमुक्त जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहनही पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड होते. सहाय्यक शिक्षक श्री. शेख यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. उत्तम शिष्यवृत्ती मार्गदर्शक व उपक्रमशील शिक्षक म्हणून श्री. शेख यांचा वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास शिक्षकवृंदासह वनपाल माणिक खोत, वर्षदा पावसकर, वनरक्षक अरुण सांगळे, जालिंदर गावडे, वनसेवक पुंडलिक नागुर्डेकर, रवी पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

No comments:
Post a Comment