समाजसेविका रेखिता देसाई यांचेकडून बागिलगे शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य - चंदगड लाईव्ह न्युज

09 October 2026

समाजसेविका रेखिता देसाई यांचेकडून बागिलगे शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

      समाजसेविका रेखिता रमेश देसाई (मुळगाव- बागिलगे, सध्या राहणार बेळगाव) यांचेकडून जि. प. प्राथमिक शाळा बागिलगे (ता. चंदगड) शाळेतील विविध स्पर्धेतील यशवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन गौरव करणेत आला. 

      प्रास्ताविक करताना अद्यापक संजय पाटील म्हणाले, ``समाजसेविका देसाई यांच्यासारख्या व्यक्तींच्या प्रेरणादायक कार्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रोत्साहन मिळते. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांना वाव मिळण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तीने पुढे आले पाहिजे असे मत व्यक्त केले. यावेळी बोलताना अध्यापक बाबुराव वरपे यांनी ``शाळा या ज्ञानाची मंदिरे आहेत. या मंदिरातून बाहेर पडणारा विद्यार्थी सुसंस्कारीत, ध्येयवादी, श्रमप्रतिष्ठा, संवेदनशीलता, परोपकारी व देशाचा व समाजाच्या व्यवस्थेचा आधारस्तंभ ठरला पाहीजेत. विद्यार्थ्यांनी आईवडील व शिक्षकांचा आदर करुन जीवनात यशस्वी व्हावे असे सांगितले. शालेय विद्यार्थी व समाजाच्या उन्नतीसाठी रेखिता देसाई यांचे कार्य प्रेरणादायी असून त्यांच्या अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांना पाठबळ मिळते असे सांगितले. मुख्याद्यापक परशराम यरोळकर यांनी आभार मानले. 

    यावेळी विविध स्पर्धा परीक्षा, प्रज्ञाशोध, तालुका व जिल्हा प्रश्नमंजुषा व क्रीडा स्पर्धेतील कु. आराध्या तेलवेकर, विराज भोगुलकर, वृंदा धुरी, सृष्टी कालकुंद्रीकर, कादंबरी पाटील, आदित्य पाटील, श्रीनंद पाटील, संदेश पाटील, संस्कार पाटील, रणवीर पाटील आधी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन प्रोत्साहित करण्यात आले. यावेळी अनिल शिवणगेकर, प्रियांका शिवणगेकर, जयश्री पाटील आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment