न. भु. पाटील ज्युनिअर कॉलेजची विभागीय क्रीडा स्पर्धेत दुहेरी यशस्वी कामगिरी! यश वाके आणि जैनब मुल्ला यांची राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड - चंदगड लाईव्ह न्युज

31 October 2026

न. भु. पाटील ज्युनिअर कॉलेजची विभागीय क्रीडा स्पर्धेत दुहेरी यशस्वी कामगिरी! यश वाके आणि जैनब मुल्ला यांची राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड

 


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

डेरवण (जि. रत्नागिरी) येथे सुरू असलेल्या विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धेत चंदगड येथील न. भु. पाटील ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत कॉलेजच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. थाळीफेक आणि भालाफेक या दोन्ही क्रीडा प्रकारांत द्वितीय क्रमांक पटकावत कु. यश विजय वाके आणि कु. जैनब अस्लम मुल्ला यांनी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे.

१७ वर्षांखालील गटात थाळीफेक या क्रीडा प्रकारात अकरावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी कु. यश विजय वाके याने द्वितीय क्रमांक पटकावला. तर १९ वर्षांखालील गटात भालाफेक या क्रीडा प्रकारात बारावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कु. जैनब अस्लम मुल्ला हिने द्वितीय क्रमांक मिळवून यश संपादन केले. या दोन्ही खेळाडूंची पालघर जिल्ह्यात होणाऱ्या राज्यस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या यशाबद्दल शालेय समितीचे चेअरमन अॅड. एन. एस. पाटील, प्राचार्य आर. पी. पाटील, उपप्राचार्य टी. एस. चांदेकर आणि पर्यवेक्षक एस. एल. बेळगावकर यांनी दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

या खेळाडूंना क्रीडाशिक्षक प्रा. एन. डी. हदगल आणि टी. व्ही. खंदाळे यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment