पाटबंधारे विभागाकडून हल्लारवाडी बंधारा दुरुस्तीचे काम सुरू, वाहतूक बंद - चंदगड लाईव्ह न्युज

06 October 2026

पाटबंधारे विभागाकडून हल्लारवाडी बंधारा दुरुस्तीचे काम सुरू, वाहतूक बंद

 

हल्लारवाडी बंधारा दुरुस्तीचे सुरू असलेले काम

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

    ताम्रपर्णी नदीवरील हल्लारवाडी, (ता. चंदगड) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे काही पिलर कोसळल्यामुळे वाहतुकीसाठी धोकादायक बनला होता. परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ, प्रवासी, वाहनधारक यांच्याकडून बंधाऱ्याच्या दुरुस्तीची वेळोवेळी मागणी सुरू होती. याची दखल घेत पाटबंधारे विभागाने बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. 


    बंधाऱ्याचे काही पिलर आधीच कोसळले होते. उर्वरित पिलर कमकुवत होऊन कोसळण्याच्या मार्गावर होते. तसेच बंधारा परिसरातील रस्ता नादुरुस्त झाल्याने वाहतुकीसाठी धोकादायक बनला होता. याची दखल घेऊन कोसळलेले व कमकुवत झालेले पिलर आज दिनांक 6 ऑक्टोबर 2026 रोजी काढून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.  या अंतर्गत पूर्णतः खराब झालेले पिलर व स्लॅब काढून घेऊन त्याठिकाणी नवीन पिलर व स्लॅब बांधकाम करणेत येणार आहे. त्यामुळे सदर बंधाऱ्यावरून होणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद असून वाहनधारकांनी कृपया पर्यायी मार्गाचा वापर करावा अशा प्रकारच्या सूचना पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत. याची प्रवासी वाहनधारकांनी नोंद घेऊन काम पूर्ण होईपर्यंत पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment