नवनिर्मितीसाठी बुद्धीमत्तेचा वापर करा - डॉ. एस. ए. मस्ती - चंदगड लाईव्ह न्युज

26 October 2018

नवनिर्मितीसाठी बुद्धीमत्तेचा वापर करा - डॉ. एस. ए. मस्ती

'माणसाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर सध्याचे युग निर्माण केले. निसर्गाच्या प्रत्येक  घटकावर त्याने विचार केला. म्हणुन नवनविन गोष्टींची निर्मिती झाली. विज्ञान युगात तर्क आणि बुद्धिमतेचा वापर केला पाहीजे. विज्ञान समजाऊन घेतले पाहीजे असे प्रतिपादन  डॉ. एस. ए. मस्ती यांनी व्यक्त केले. हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशंवतराव चव्हाण महाविद्यालयात आयोजित केलेल्या डॉ. घाळी अग्रणी महाविद्यालय अतंर्गत 'इन्सुट्युमेटेंशनविषयावर कार्यशाळेत बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. वाय. निंबाळकर होते.
कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. राजेश घोरपडे यांनी प्रास्ताविक केले. दौलत विश्वस्त सस्थेचे अध्यक्ष संजय पाटील याच्या हस्ते डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. यावेळी डॉ. मस्ती यांनी "वैज्ञानिक उपकरणे तयार करत असताना त्याचे तत्त्व समजाऊण घेतले पाहीजे. आपली बुद्धिमत्ता वापरता आली पाहीजे. यासाठी लागणारी कौशल्य आत्मसात केली पाहीजे. यावेळी साठ वेगवेगळया प्रयोगांची माहीती दिली.``
 दुसऱ्या सत्रात बेळगाव येथील भाऊराव काकतकर महाविद्यालयातील प्रा. अवधुत मालगे यांनी संगणक प्रणालीद्वारे वैज्ञाणिक साधनाचा वापर या विषयावर माहीती दिली. 'शिक्षण क्षेत्रात व व्यवसायात करिअर  करण्यासाठी संगणक प्रणाली फार उपयुक्त आहे. वैज्ञानिक उपकरणे तयार करत असताना प्रयोग आणि उत्पती यांची सांगड घातली पाहीजे. संगणक प्रणालीद्वारे वैज्ञानिक साधनांचा वापर केल्यामुळे अचुकता राहते. कमी श्रमात कमी पैशात आकर्षक साहित्य निर्मीती होऊ शकते.असे मत प्रा. मालगे यांनी व्यक्त केले. विज्ञानातीत अनेक प्रयोग सगंणकाद्वारे कसे सुलभ करता येतात याची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.
'विज्ञानातील नवनवीन कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करावी. त्यांच्याकडे संधी म्हणून पाहावे असे मत प्रा. निंबाळकर यांनी व्यक्त केले. या कार्यशाळेस चंदगडआजरागडहिग्लज येथील महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रा. एन. पी. पाटील यांनी तर आभार प्रा. ए.  आर. चव्हाण यांनी मानले.