माडवळे येथे दिपावलीनिमित्त कबड्डी स्पर्धेचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

26 October 2018

माडवळे येथे दिपावलीनिमित्त कबड्डी स्पर्धेचे आयोजन

माडवळे ता. चंदगड येथील रामलिंग नवयुवक कलाक्रीडा व सांस्कृतिक मंडळ,  यांच्या वतीने खास दीपावलीनिमित्त सोमवार (ता. 5) सायंकाळी चार वाजता खुल्या व 55 किलो वजनी गटातील कबड्डी स्पर्धा आयोजित केल्या आहेत. खुल्या गटासाठी 11001, 7001, 3001 तर 55 किलो वजनी गटासाठी 7001, 5001 व 3001 अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. इच्छुक संघानी  संदीप गावडे व जयवंत कांबळे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. संघातील खेळाडू हे एकाच गावातील असावेत. त्यासाठी प्रत्येक खेळाडूने सोबत आधार कार्ड व ओळखपत्र आणने अनिवार्य आहे.