विहीरीत पडून करंजगावच्या एकाचा मृत्यू - चंदगड लाईव्ह न्युज

26 October 2018

विहीरीत पडून करंजगावच्या एकाचा मृत्यू

करंजगाव (ता. चंदगड) येथील पटकी नावाच्या शेतात पुंडलिक रामू कांबळे (वय-52) यांचा शेतातीत विहीरीत बुडून मृत्यू झाला. आज सकाळी सात वाजता हि घटना घडली. धोंडीबा अंबाजी कांबळे यांनी याबाबतची माहीती चंदगड पोलिसात दिली. पुंडलिक हे करंजगाव जवळील आपल्या शेताकडे गेले होते. बराच वेळ झाला तरी ते घरी न परतल्याने घरच्यांनी शोध घेतला. त्यावेळी धोंडीबा कांबळे यांना पटकी नावाच्या शेतातील विहिरीच्या बाहेर त्याची बँटरी व चप्पल दिसली. तर विहीरीच्या पाण्यात त्यांच्या गळ्यातील माळ तरंगत असल्याचे दिसले. लागलीच त्यांनी पानबुड्यांना आणून विहिरीत शोध घेतला असता त्यांचा मृतदेह आढळून आला. चंदगड येथील ग्रामीण रुग्णांलयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून स. फौ. डी. एन. पाटील तपास करीत आहेत.