![]() |
चंदगड येथे शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या स्वागतावेळी उपस्थित लिंगायत समाजबांधव. |
चंदगड / प्रतिनिधी
श्री. म. न. प्र. श्री. शिवलिंगेश्वर
महास्वामीजी (सिध्द संस्थान मठ निडसोशी) यांचे मंगळवारी सकाळी लिंगायत मठ, चंदगड येथे आगमन चंदगड शहरात झाले. बाळासाहेब तेली यांचे निवासस्थानी शन्मुख
हिरेमठ व इतर स्वामींनी उपस्थिती दर्शविली.
यावेळी पदस्पर्शने पादपुजन झाले. स्वामींनी
उपस्थित सर्वाना शुभाशीर्वाद दिला. चंदगड तालुका लिंगायत धर्म महासभा कोल्हापूरचे
वतीने चंद्रशेखर विश्वनाथ तारळी (जिल्हा उपाध्यक) चंदगड तालुक्यातील समस्त लिंगायत
बांधवांना शनिवार १ डिसेंबर रोजी नारायणराव घोरपडे नाट्यगृह इचलकरंजी येथे दुपारी एक
ते चार वाजेपर्यंत राज्य स्तरीय महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. सदर
महामेळाव्यात लिंगायत दिनदर्शिका व. बसव डायरी चे प्रकाशन, लिंगायत धर्माला अल्पसंख्याक दर्जा
द्या यावर चर्चा होणार आहे. १० ते १२ डिंसेबर रोजी दिल्ली येथे लिंगायत महाधरणे आंदोलनाबाबत
जमलेल्या सर्व
लिंगायत बंधूंना माहिती दिली. सर्वांनी
एकत्र सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. या कार्यक्रमाला शिवानंद हुंबरवाडी, मलिकाजुन वाटंगी, व्ही. एस. वाली, हिरेमठ बंधू, उमेश तेली, अरुण होंगल, महादेव
प्रसादे, भास्कर कामत, शिवशक्ती बॅंक नेसरीचे सर्व पदाधिकारी, समस्त लिंगायत बांधव
व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment