किर्तीकुमार बेनके थाळी फेक मध्ये देशात प्रथम - चंदगड लाईव्ह न्युज

27 November 2018

किर्तीकुमार बेनके थाळी फेक मध्ये देशात प्रथम

किर्तीकुमार बेनके


चंदगड / प्रतिनिधी
चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाचा विद्यार्थ्यी कीर्तीकुमार बेनके याने मेंगलोर विद्यापीठ येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ मैदानी स्पर्धमध्ये थाळीफेक या क्रीडाप्रकारात ५२.७९ मीटर थाळी फेकून देशात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदकाची कमाई केली. कीर्ती कुमारचे शिक्षण र. भा. माडखोलकर महाविद्यालयात झाले. या थाळी फेक क्रीडा प्रकारासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांचे प्रोत्साहन व प्रा. एस. एम. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.



3 comments:

Unknown said...

Congratulations

Unknown said...

अभिनंदन किर्तिकुमार

Unknown said...

Congrates kirtikumar, ashich Kirti wadhat jaude tumachi

Post a Comment