उत्साळी गावच्या विकासाला कटिबद्ध आहे – माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

22 November 2018

उत्साळी गावच्या विकासाला कटिबद्ध आहे – माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील


उत्साळी (ता. चंदगड) येथे विकासकामांचे उद्गाटन करताना माजी राज्यमंत्री भरमू पाटील. शेजारी जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, सरपंच सौ. माधुरी सावंत-भोसले व इतर ग्रामस्थ.
अडकूर / प्रतिनिधी 
उत्साळी गावासाठी मी आमदार असताना विकासाची गंगा आणली. येथून पुढे ही उत्साळी गावच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे गौरवोद्गार माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील यांनी उत्साळी (ता. चंदगड) येथील अडकूर – उत्साळी रस्त्याच्या खड्डेभरणी उद्घाटन प्रसंगी काढले. अध्यक्षस्थानी सरपंच सौ. माधुरी सावंत-भोसले होत्या.
स्वागत ग्रामपंचायत सदस्य रुक्माणा मटकर यांनी केले. प्रास्ताविक अनंत कदम यांनी केले. माजी राज्यमंत्री श्री. पाटील म्हणाले, ``अडकूर- उत्साळी रस्त्यावर पहिले डांबर टाकण्याचा मान मला मिळाला. येथून पुढेही या गावच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे.`` जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ म्हणाले, `उत्साळी गावाने मला भरघोस मते देऊन माझ्या विजयामध्ये भर घातली आहे. त्यामुळे मी गावच्या विकासासाठी भरपूर निधी उपलब्ध करुन गावाचा विकास करेन अशी ग्वाही दिली.`` अध्यभस्थानावरुन सरपंच सौ. सावंत-भोसले म्हणाल्या, गट-तट न करता गावाच्या विकासासाठी मी कटिबद्ध राहून भरघोस निधी आणून गावचा विकास करेन. गावाने ग्रामपंचायत बिनविरोध करुन जो माझ्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाला पात्र राहून मी विकास करेन``
यावेळी उपसभापती विठाबाई मुरकुटे, आर. के. देसाई, डेपोटी इंजिनिअर नंदकुमार जाधव, पोलिस पाटील भरत देसाई, ग्रामसेविका अश्विनी कुंभार, अनिता मटकर, अनिल देसाई व ग्रामस्थ उपस्थित होते. सुत्रसंचालन संतोष सावंत-भोसले यांनी केले. आभार पो. पाटील भरत देसाई यांनी मानले.