मनसे विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष सुभेदार यांच्या वाढदिवसानिमित्त फळे व पेन वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

22 November 2018

मनसे विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष सुभेदार यांच्या वाढदिवसानिमित्त फळे व पेन वाटप

महिपाळगड (ता. चंदगड) येथील हायस्कूलमध्ये सुभेदार यांच्या वाढदिवसानिमित्त फळे व पेन वाटप झाले. 
हलकर्णी / प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष राज सुभेदार यांचा वाढदिवस महीपाळगड (ता. चंदगड) येथील हायस्कुलमध्ये फळे व मुलांना पेन वाटप करुन साजरा करण्यात आला. राज ठाकरेची मनसे ही तरुणवर्गात जाऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी वाढदिवसानिमित्त राज सुभेदार यांनी सांगितले. यावेळी मराठा क्रांती सघंटना पाश्चिम महाराष्ट अध्यक्ष विठ्ठल पेडणेकर, मनसे तालुका अध्यक्ष सत्वशिल पाटील, तालुका उपाध्यक्ष अविनाश पाटील, प्रल्हाद चौकुळकर, नितेश नाईक, राहुल पाटील, विकी मनगुतकर, राहुल पाटील, सागरगावडे, अभिजीत पाटील आदि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मुख्याद्यापकासह सर्व शिक्षक, विद्यार्थी, व विद्यार्थीनी उपस्थित होत्या.