![]() |
कोवाड (ता. चंदगड) येथे शौचालय दिनानिमित्त शौचालयाचे महत्व सांगताना आरोग्य रक्षक शैलेश वाघमारे |
हलकर्णी / प्रतिनिधी
'शौचालय ही
आरोग्य संपन्न जिवनाची पहीली पायरी आहे. शौचालय तथा सडांसच्या १०० टक्के वापरामुळे
पाणी, हवा व अन्नाद्वारे पसरणाऱ्या अनेक
रोगांना आपण आळा घालु शकतो. ' असे प्रतिपादन
कोवाड प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य रक्षक शैलेश वाघमारे यांनी केले. कोवाड
(ता. चंदगड) येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत जागतिक शौचालय दिनानिमित्य 'शौचालयाचे महत्त्व ' या विषयावर
मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्रीकांत पाटील
होते.
स्वागत लता सुंरगे यांनी केले. प्रास्ताविक
श्रीकांत पाटील यांनी केले. यावेळी श्री. वाघमारे पुढे म्हणाले, ``महाराष्ट्रात
आतापर्यंत ६० लाखावर शौचालयांचे बाधंकाम वापर सुरू असले तरी पश्चिम
महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाडयात अजुनही लोकांचे प्रबोधन होण्याची गरज आहे. शासनाकडून
शौचालय बाधंण्यासाठी अनुदाने मिळते त्याचा नागरीकांनी लाभ घ्यावा. नवऱ्याच्या घरी
शौचालय नसल्यास लग्नास नकार देणाऱ्या मुलीचीं संख्या समाजात वाढली आहे. हे शौचालय
बाबतचे जागरूकतेचे लक्षण आहे. यासह पोलिओ, रुबेला, गोवर, जतं निर्मुलन
आदीबाबतही माहीती दिली.``
मुख्याध्यापक श्रीकांत पाटील यांनी ``सरकारने राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या नावाने सुरु
केलेल्या हागणदरी मुक्त ग्राम योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळेच गावे निर्मळ
होण्याबरोबरच हवा, पाणी, अन्न यांचे प्रदुषण काही प्रमाणात थांबले. समाजात घरी शौचालय नसणे हे
अप्रतिष्ठ व असंस्कृत पणाचे द्योतक असल्याचे सांगितले. यावेळी मधुमती गवस, पुष्पा नेसरकर, भावना आतवाडकर
आदिसंह विद्यार्थी उपस्थित होते. आभार कवीता पाटील यांनी मानले.