सलग तीन दिवस बँका राहणार बंद - चंदगड लाईव्ह न्युज

22 November 2018

सलग तीन दिवस बँका राहणार बंद


या आठवड्यात शुक्रवारी, शनिवारी व रविवारी बँका बंद रहाणार आहेत. शुक्रवारी (ता. 23) गुरुनानक जयंती असल्याने सुट्टी आहे. शनिवारी (ता. 24) चौथा शनिवार असल्यामुळे व रविवारी (25) रविवार असल्यामुळे बँक सलग तीन दिवस बंद राहतील. त्यामुळे आपल्या बँकेतील काही व्यवहार असतील तर आज गुरुवारीच पुर्ण करुन घावे लागणार आहेत. सोमवारी (ता. 26) बँका सुरु असतील. तीन दिवस बँका बंद असल्यामुळे एटीएम, ग्राहक सेवा केंद्र व नेटबँकींगवर अवलंबून रहावे लागणार आहे.