अडकूर हायस्कूलमध्ये गोवर रुबेला एम आर कार्ड वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

22 November 2018

अडकूर हायस्कूलमध्ये गोवर रुबेला एम आर कार्ड वाटप

अडकूर (ता. चंदगड) येथील शिवशक्ती हायस्कूलमध्ये गोवर रुबेला एम आर कार्डचे वितरण झाले.


अडकूर / प्रतिनिधी - 
श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज अडकूर (ता. चंदगड) येथे इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थीना महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालय व प्राथमिक आरोग्य केंद्र अडकूर यांच्या वतीने गोवर रुबेला एम. आर. माहिती कार्डचे वितरण करण्यात आले. या कार्डमध्ये गोवर व रुबेला संदर्भात माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर लक्षात ठेवण्यासाठीचे महत्त्वाचे मुद्दे देण्यात आले आहेत. 27  नोव्हेंबर रोजी हे लसीकरण होणार असून मुख्याध्यापक डी. जी. कांबळे, पर्यवेक्षक एस. जी. पाटील, आर. पी. पाटील, एस के पाटील, जी. व्ही. कांबळे यांच्या हस्ते कार्ड वितरण करण्यात आले.